आघाडी सरकारने संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर संविधान दिनाच्या दिवशी निशाणा साधला आहे. “आदिवासी महिलांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसाचं महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं, अशा शब्दात वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर आज निशाणा साधला. त्यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, वसईत पोलिसांनी चोर समजून ६ आदिवासी महिलांना बेदम मारहाण केली आहे. पोलिस यंत्रणांची महाविकास आघाडी सरकारची हीच खरी वृत्ती आहे. इंग्रजांच्या जुल्मी राजवटी सारखी पोलिसाचे तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं, जय भीम ! असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

पोलिसांच्या या प्रकारामुळे आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास सुरु असून चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. मात्र, पोलिसांवर कारवाई करण्यात आली नसल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकावर संविधान दिनी हल्लाबोल केला आहे.

You might also like