गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण स्वीकारले आहे का ? चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पारधी समाजातील सुमन काळे यांचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून निशाणा साधला आहे. “रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण राज्यसरकारने स्वीकारले आहे का? हा प्रश्न सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे उभा ठाकतोय,” असे वाघ यांनी म्हंटले आहे.

चित्र वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “पारधी समाजातील सुमन काळे यांचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला. 14 वर्ष होऊनही अद्याप न्याय मिळाला नाही. 13 जानेवारी 2021 रोजी उच्चन्यायालयाने निर्देश देऊनही कुठलीच हालचाल राज्य सरकारने केली नाही. रक्षकांना भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचे नैतिक बळ वाढवायचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल आहे का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पारधी समाजातील सुमन काळे यांच्या मृत्यू प्रकरणावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रही लिहले आहे. त्यातून त्यांनी पारधी समाजातील सुमन काळे यांना 14 वर्ष होऊनही अद्याप न्याय मिळाला नाही. 13 जानेवारी 2021 रोजी उच्चन्यायालयाने निर्देश देऊनही कुठलीच हालचाल राज्य सरकारने केली नाही, असे वाघ यांनी पत्रातून सांगितले आहे.

You might also like