शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे ; ‘या’ भाजपा नेत्याच्या आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पडेल अशी भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याने शरद पवारांवर मोठा गंभीर आरोप करत राजकीय खळबळ निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे

कर्डीले पुढे म्हणाले, हे सरकार कोरोनाला रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होतंय की, हे सरकार अपयशी ठरलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment