जर चूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एडीची नोटीस आली होती. यावर त्यांनी राऊतांना टोला लगावला. केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पार्टी च्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या शेतकरी आत्मनिर्भर यात्रेचा समारोप आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले.

संजय राऊत यांचे पत्नी ला आलेल्या ईडीच्या नोटीशी विषयी व त्यांनी केलेल्या टि्वट विषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की संजय राऊत रोज ट्विट करत असतात त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे त्यांना अनेक शेर गाणी पाठ आहेत. जेव्हा त्यांना दुसरे काम नसतं त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्विट करत असतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच मी ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच विचारा . कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही आणि चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे काम नाही असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

काही दिवसांनी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल आणि तेव्हा अजित पवार भाजपला साथ देतील असा खळबळजनक दावा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला होता याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की रामदास आठवले यांचे सगळ्या पक्षात संबंध आहेत त्याबद्दल त्यांना अधिक माहिती असणार मी काही बोलणार नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं असून सरकार कडून बांधकाम क्षेत्रात काही मूठभर खासगी लोकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जातात अस त्यात मी नमूद केलं आहे. तसेच या पत्रात 72 टक्क्यांनी रेडी रेकनर कमी केल्याचं मी दाखवून दिलंय सर्व नागरिकांना फायदा होईल असे निर्णय घेतले पाहिजेत असे म्हटलंय अन्यथा मी पीआयएल दाखल करेन असं पत्रात लिहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment