जामीन मिळाल्यानंतर राणेंना फडणवीसांचा फोन; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 अटींसह मंत्री राणेंना जामीन मंजूर केला. त्यानंतर भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राणेंच्या वक्तव्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र्भर उमटले. अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून दगडफेक, राडा करत निषेध नोंदविण्यात आला. तर दुसरीकडे राणेंच्या जामिनासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले केले.  शेवटी दिवसभराच्या हालचालीनानंतर मंगळवारी रात्री उशिरा मंत्री राणेंना जामीन मंजूर करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून संवाद साधला. “मंत्री राणेजी भाजप पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

रत्नागिरी पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी नारायण राणेंनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मंत्री राणेंना रात्री उशिरा महाड येथे नेले. या ठिकाणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह राणे यांना जामीन मंजूर केला.

Leave a Comment