हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यरात्री म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून राज्य सरकावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या परीक्षेवरून भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही ! हा म्हणजे भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस !, आहे,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
म्हाडाच्या परीक्षेच्या रद्दच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सर्कावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका ! दोषींवर कठोर कारवाई कराच ! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?,” असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
“आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही ! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस !”, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.