निसर्गग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी; राज्य सरकारने ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी- फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना अधिक मदत करण्याची मागणी केली. राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, असं ते म्हणाले.

चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही अत्यंत तुटपुंजी असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के मदत करावी, अशी मागणी करतानाच नुकसानग्रस्तांना तातडीने रोखीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने कर्ज काढून पैसा उभा करावा याचा पुनरुच्चार केला. राज्यातील जनता अडचणीत असताना सरकारने व्यावहारिक निर्णय घ्यायला हवेत. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असंही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या कामाचं गुणगान
आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्या टर्ममधील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात कठोर निर्णय घेतले आहेत. जे आयुष्यात कधी पाहू शकलो नसतो असे निर्णय पंतप्रधान यांनी घेतले आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. ३७० कलम रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय यापैकी आहे. यामुळे या भागात आमूलाग्र बदल होत आहे. CAA मध्ये सुधारणा करत निर्णय घेतला. ट्रिपल तलाक वर बंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला. करतापूर कॉरिडॉर, बोडो बाबत निर्णय, राफेल निर्णय, आयुष्यमान भारत मध्ये एक कोटी लोकांना लाभ मिळत आहे, प्रधानमंत्री किसान योजना असे निर्णय घेतले असं सांगत फडणवीसांनी मोदी सरकारचं गुणगान गायलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment