कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उमटले. अनेक ठिकाणी जाळपोळ तसेच हिंसाचाराची घटनाही घडली. दरम्यान भाजपने पुकारलेल्या एकदिवसीय बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांकडून आज माजी मंत्री व भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. “महाविकास आघाडी कडून हिंदूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाहीत,” अशी टीका अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकावर केली.

अमरावती बंद पुकारल्या प्रकरणी आज पोलिसांकडून अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह १३ भाजप कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जो ४० हजार मुस्लिमांनी अमरावतीत हिंसाचार केला. निदर्शने केली. त्यांच्या विरोधात भाजपने जो शांततेच्या पद्धतीने निदर्शने केली, निषेध व्यक्त केला. त्याच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे.

दरम्यान आज पोलिसांकडून भाजप नेत्यांवर करण्यात आलेल्या कार्रवाईवरून आता महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यावती पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांवरील अटकेच्या कार्रवाईवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

Leave a Comment