‘मी आता सीडी लावणार!’ खडसेंनी दिले मोठ्या गौप्यस्फोटाचे संकेत; भाजपसाठी धोक्याची घंटा?

जळगाव । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडी चौकशीमुळे आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असा इशारा खडसे मी भाजपाला मागे दिला होता. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. तेव्हा आता मला सीडी लावावीच लागेल”, असा पुन्हा एकदा इशारा खडसेंनी भाजपला दिला आहे.

भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी हा इशारा दिला. या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी ईडी चौकशीवरून जोरदार निशाणा साधला.

”मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे”, असे सांगत खडसे यांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like