‘जे हौशे-गवशे आहेत तेच पक्ष सोडून जातील’; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधनीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर निशाणा साधला. “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला.

“राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला (Girish Mahajan slams Eknath Khadse).

दरम्यान, “आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल”, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. “जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment