आता अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने भरणार ओटी; गोपीचंद पडळकरांचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून मागण्या मान्य केल्या जात नसल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. “दुपारी चार वाजेपर्यंत परिवहनमंत्री अनिल परब यांनी मागण्या मान्य न केल्यास एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जाऊन परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरू, असा इशारा पडळकरांनी दिला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ठाकरे सरकार म्हणत आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे. काल मंत्री सुरभी असेच काही म्हणाले किआम्ही बोलायचं कुणाशी. परब यानिआ सांगू इच्छितो कि या ठिकाणी तुमच्या हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना’. आंदोलकांशी चर्चा करायची सोडून राज्य सरकार प्रसिद्धी माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत आहे.

आमच्या मागण्या काय आहेत त्या नीट लक्षात घ्याव्यात. आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असे म्हणत नाही. तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळते तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसे मिळू शकते हे सांगितले आहे. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 7 तारखेला झाले पाहिजेत. हे एसटी कर्मचारी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो, असे पडळकर यांनी म्हंटले.

Leave a Comment