भाजपने घेतला अण्णांचा धसका? दिल्लीत आंदोलन करण्याचं जाहीर करताचं हरिभाऊ बागडे राळेगणसिद्धीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राळेगणसिद्धी । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपमध्ये एकचं खळबळ उडाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची धास्ती घेतल्यानेच या गाठीभेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. (bjp leader haribhau bagade meets Anna Hazare at ralegan siddhi)

काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी आले होते. शेतकऱ्यांनी थाळी वाजवून अण्णा हजारे यांच्यासमोर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी अण्णांशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी शेतकरी आंदोलनाला आपला सुरुवातीपासूनच पाठिंबा असल्याचं सांगतानाच आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही अण्णांनी या आंदोलकांना दिलं होतं. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तोंडचे पाणी पळालेल्या केंद्र सरकारची अण्णांनी आंदोलन केल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. अण्णांनी दिल्लीत आंदोलन (Farmer Protest) केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भाजप नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ राठोड यांनी आज अण्णांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड तास बंद दाराआड खलबतं झाली. कृषी कायद्याच्या अनुषंगानेच या भेटीत अधिक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, अण्णा आणि बागडे यांनी या भेटीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या दीड तासाच्या भेटीनंतर अण्णा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment