अजित पवारांच्या भ्रष्ट व्यवहार प्रकरणी दुपारी ईडीला भेटणार; किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांनी आता आपला मोर्चाचे पवार कुरुंबाकडे वळविला आहे, सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी लवकरच ईडीसमोर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या घोटाळ्याचे कागदपत्र सादर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला असून दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान सोमय्या यांनी आज पुन्हा याप्रकरणी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “दुपारी 2 वाजता मी जरंडेश्वर साखर कारखाना शेतकरी/संस्थापकांसह ईडी मुंबईच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांचा बेनामी भ्रष्ट व्यवहारासाठी भेटणार आहे.”

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनीअजित पवार व शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लबोलही केला. आता जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment