विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर गंभीर आरोप, नोकरीतून मुक्त करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी मधील मंत्र्यांबरोबर आता अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांशी संबंधित मालमत्तेची चौकशी सुरु आहे. जालना साखर कारखान्याचे एक खोतकर कुटुंबीय आणि दुसरे मुळे कुटुंबीय हे दोन मालक आहेत. त्यातल्या एक भागधारक या मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. त्याचे नाव रुपाली विश्वास पाटील असे आहे. त्या मुंबई पोलीस दलाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी आहेत.

कसे काय मुंबईचा एक पोलीस सह आयुक्त बेनामी पद्धतीने साखर कारखाना घेतो. आणि दुसरा पोलीस सह आयुक्त मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेली चौकशी बंद करतो. वास्तविक पाहता खरी माहिती हि आहे की, जून २०१९ मध्ये स्वतः उच्च न्यायालयाने बेनामी पद्धतीने खरेदी केलेल्या साखर कारखाण्याचे बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तसा तपास करण्यात आला नाही. आता माझी मागणी हि आहे की, या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करावे, असे सोमय्या यांनी म्हंटले.

Leave a Comment