ही आहे ठाकरे सरकारची माफियागिरी; किरीट सोमय्यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक ड्रग माफियासाठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नाही मुस्लिम आहे, आरोप करतात. जितेंद्र आव्हाड, अनंत करमुडेचे अपहरण करतात, ही तर ठाकरे सरकारची माफियागिरी, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, हि आहे ठाकरे सरकारची माफियागिरी. नवाब मलिक ड्रग माफिया साठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नाही मुस्लिम आहे आरोप करतात. हसन मुश्रीफ रुपये १५ हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्टसाठी कंपनीचे नाव जयास्तुते ठेवतात. जितेंद्र आव्हाड अनंत करमुडे चे अपहरण करतात. अजित पवार बेनामी व्यवहार द्वारा कारखाना लाटतात.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक प्रकरणातून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. दरम्यान सोमय्या यांनी आज थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.