जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबत ईडीकडे पुरावे केले सादर – किरीट सोमय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांनी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर “आज ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांना जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा आहे. आणि त्याबाबतची सर्व कागदपत्रे, जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी आपण दुपारी जरंडेश्वर साखर कारखाना शेतकरी/संस्थापकांसह ईडी मुंबईच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे जरंडेश्वर कारखान्याबाबत तक्रार केली. जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा आहे असे सांगितले. तसेच जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले आहेत. मला विश्वास आहे कि शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अजित पवार व शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लबोलही केला.

Leave a Comment