भाजपनेते किरीट सोमय्यांचे राऊतांना चॅलेंज; म्हणाले, हिम्मत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपनेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा इशारा देत आज सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना चॅलेंज दिले. ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. सामनाच्या सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून राऊतांनी सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर सोमय्या यांनी राऊतांना चॅलेंज दिले आहे. मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणण्याचा इशारा देत भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान सोमय्या मंगळवारी व बुधवारी कोल्हापूरला जाणार आहेत.