हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशातून एक लाज आणणारी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्याचा एका महिलेसोबत भर रस्त्यात सेक्स करतानाच विडिओ समोर आला आहे. मनोहरलाल धाकड (Manohar Lal Dhakad) असं या नेत्याचं नाव असून ते मंदसौर जिल्ह्यातील बानी गावातील रहिवासी आणि जिल्हा पंचायत सदस्याचे पती आहेत. मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर एका महिलेसोबत लैंगिक संबंध करत असताना ते रंगेहात सापडले आहेत. याबाबतचा विडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला असून भर रस्त्यात असले काळे धंदे करताना कोणत्याही प्रकारची लाज या नेत्याला वाटली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदसौर जिल्ह्यातील दलौदा तहसीलमधील बानी गावातील रहिवासी भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा लैंगिक संबंध ठेवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांच्यासोबत कपडे न घातलेली एक महिला दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून हायवेवर उतरताना दिसत आहेत. त्यानंतर भर रस्त्यातच अंधाराचा फायदा घेऊन सेक्स सुरु करतात. अत्यंत लाजिरवाणी अशी हि गोष्ट आहे. आसपास कोणी आहे कि नाही हे न बघता सुरु केलेलं हे अश्लील कृत्य सीसीटीव्ही मुळे उघड पडलं. या प्रकरणामुळे भाजपची मान शरमेनं खाली गेली आहे.
भर रस्त्यावरील सेक्स विडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोहरलाल धाकड यांच्यावर चहुबाजूनी टीकेची झोड उठवण्यात येतेय. भाजप नेतेही यामुळे तोंडावर पडले आहेत. मनोहरलाल धाकड यांच्या पत्नी सध्या मंदसौर जिल्हा पंचायत सदस्या आहेत, ज्यांना भाजपचा पाठिंबा आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित म्हणाले की, पक्षाला अशा गोष्टी करणाऱ्या लोकांची गरज नाही. या घटनेनंतर भाजपने मनोहरलाल धाकडवर मोठी कारवाई केली आहे. धाकडला युवा संघाच्या राष्ट्रीय मंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच प्रकरणाचे गांभीर्य बघून भानपुरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 296 285 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.




