“मराठा आरक्षण रद्द केले हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा पत्र लिहले आहे. “महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले हा काही योगायोग नव्हता. तुमचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले”, असा आरोपही राणा जगजितसिंह पाटलांनी पत्रातुन केला आहे.

या पत्रात राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हंटले आहे की, “तुमचे सरकार सत्तेत आले आणि कोर्टाने आरक्षण रद्द केले, हा योगायोग नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले हा काही योगायोग नव्हता. कारण आपले सरकार मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यात कमकुवत राहिले आणि अपयशी झाले, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

ज्यावेळी मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयीन लढ्या देण्यात आला. त्यादरम्यान वकील आणि सरकार यांमध्ये समन्वयाचा अभाव असलेला दिसून आला. कोणतीही व्युव्हरचना यातून दिसली नाही. यातून आपली मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती हे सिद्ध झाले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उमेदीचे वर्ष हातचे निसटले आणि अनेकजण नैराश्यात गेले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment