मलिकांच्या आरोपांना मी घाबरत नाही, सडेतोड उत्तर देणार; मोहित कंबोज यांचा मलिकांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. समीर वानखेडे आणि भाजप नेते मोहित कंबोज हे साथीदार आहेत. ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईड मोहित कंबोज आहे. मालिकांच्या या आरोपांना भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले. “मलिकांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जात आहेत. मी मलिक यांना घाबरत नाही, मलिक सांगा ३ हजार कोटींची संपत्ती कशी काय? ती कोणत्या भंगारातून आणली? आता सडेतोड उत्तर देणार आहे, असे मोहित कंबोज यांनी म्हंटले.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले तसेच यावेळी मलिकांवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक खोटे आरोप करत आहेत. मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही, शेवटी विजय सत्याचा होईल. मंत्र्यांच्या मुलांचा ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहे? मी मलिकांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. मलिकांना मी घाबरत नाही, असे मोहित कंबोज यांनी म्हंटले

माझा आरोप आजही आहे कि, महाराष्ट्रातील माजी गृहमंत्र्यांनी दाऊद इब्राहीमसोबत सह्याद्री विश्रामगृहात कोणत्या खोलीत काय? बैठक केलेत होती? 1 हजार 400 करोड रुपयांची उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांची बेनामी संपत्ती आयकर विभागाने सील केली. यावर आजपर्यंत का गप्प आहेत? कुठून आली अजित पवारांकडे संपत्ती? अनिल देशमुखांची जी चौकशी चालू आहे याचे उत्तर मलिक यांनी द्यावे. सरकारच्या माध्यमातून आमचा आवाज दाबण्याचा पर्यत केला जात असेल तर मलिक यांनी लक्षात ठेवावे कि आम्ही त्यांना कघाबरनार नाही, असे कंबोज यांनी म्हंटले.

Leave a Comment