हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब शिवसेनेचा कलेक्टर आहे, सगळ्यांचे पैसे गोळा करतो अस राणे म्हणाले.
एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटीची आहे. एसटी बसेसची अवस्था तर अशी झाली आहे की खरंतर त्यांना रस्त्यावर आणण्याची परवानगी नसली पाहिजे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, कलेक्टर आहे तो शिवसेनेचा.” असं म्हणत नारायण राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली.
दरम्यान, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेवरून महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचं तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वैफल्यानं आत्महत्या करत आहेत. आतातरी सरकार जाग होणार आहे की नाही? असा सवाल दरेकरांनी केलाय.