केंद्रात सत्तेत यायला २७२ खासदार लागतात २७२ कार्यकर्ते नाही; निलेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरेंच्या य वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. केंद्रात सत्तेत येण्यासाठी २७२ खासदार लागतात २७२ कार्यकर्ते नाही असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना शिवसेनेची पुढील ध्येय धोरणे सांगितली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात भाजपवर टीकास्त्र सोडले. ”दुस-या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेत ट्विट केलं. ते म्हणाले, ”२७२ खासदार लागतात केंद्रात सत्ता बसवायला, २७२ कार्यकर्ते नाही. २०२४ पर्यंत २७२ कार्यकर्ते जरी राहिले तरी भरपूर झाले.” दरम्यान, निलेश राणे सातत्यानं शिवसेनवर टीका करत आहेत.

 

Leave a Comment