पुणेकरांना दिलासा म्हणजे अजित पवारांना उशिरा सुचलेलं शहाणपण; निलेश राणेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे, पिंपरी चिंचवड येथील निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याची माहिती दिली. यावरून आता भाजपनेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ” पुणेकरांना कोरोना निर्बंधात शिथिलता, दिलासा देणे म्हणजे अजित पवारांना उशिरा सुचलेलं शहाणपण,” अशा शब्दात राणेंनी पवारांना टोला लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याची माहिती देताच त्यांना भाजपचे नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे टोला लगावला. राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आता पुणेकरांना दिलासा म्हणजे अजित पवारांना उशिरा सुचलेलं शहाणपण. टीका झाल्यानंतर अजित पवार नेहमीप्रमाणे घाबरले. पुण्याची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी फार मेहनत व बुद्धिमत्ता लागणार म्हणून त्यासाठी महाराष्ट्राला अर्थमंत्री वेगळा लागणार. अचानक २४ तास गायब होणारा अर्थमंत्री नको.”

यापूर्वीही निलेश राणे यांनी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे कुठला अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नसल्याचा आरोपही केला होता.

Leave a Comment