दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे; निलेश राणेंचा काँग्रेस नेत्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आणि काँग्रेसची विकेटच घेतली. ममतांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका करीत काँग्रेस नेतृत्वाच्या कॉलर वरच हात टाकला पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे वाटतात,” असे राणे त्यांनी म्हंटले आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आणि काँग्रेसची विकेटच घेतली. UPA BPA कुछ नहीं है, असं बोलून काँग्रेस नेतृत्वाच्या कॉलर वरच हात टाकला पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना फरक पडणार नाही कारण त्यांचं दुकान इथे चांगलं सुरू आहे, दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे असल्याचे राणे यांनी म्हंटले आहे.

निलेश राणे यांनी यापूर्वीही ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी म्हंटले होते की, “ममताजी जेव्हा 7 व्या इयतेत होत्या तेव्हा पहिल्यांदा पवार साहेब आमदार झाले आणि आता ममताजी चे 221आणि शरद पवारांचे 54 MLA, मोदीजी पहिल्यांदा आमदार/मुख्यमंत्री झालेले तेंव्हा पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, मोदीजी 2 वेळा पंतप्रधान आणि 304 खासदार आणि पवार साहेबांकडे 4 खासदार आहेत,” असे राणे यांनी म्हंटले होते.

You might also like