अनिल परब यांची भूमिका दुटप्पी, त्यांनीच मेस्माला विरोध केलेला; नितेश राणे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप केला जात असताना आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परब यांनी मेस्मा कायद्या अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण या कायद्याचा त्यांनी भाजपच्या सरकारमध्येच विरोध केला होता. परब यांची भूमिका ही दुटप्पी आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कामगार विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करीत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी त्यांच्यावर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. हे योग्य नाही. ज्यावेळी भाजपचे सरकार होते. त्यावेळी याचा परिवहनमंत्र्यांनी या कायद्याला विरोध केला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्याबाबत आज कशोर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्यामध्ये त्यांनी कामगारांनी राज्य सरकारकडून देण्यात आलेली पगारवाढ स्वीकारावी आणि कामावर हजर व्हावे अन्यथा मेस्मा कायदा लागू करून कारवाई करू, असे परब यांनी म्हंटले होते. यावरून भाजप आता चांगलीच आक्रमक झाली असून भाजप नेत्यांकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे.

You might also like