सरकारने शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन नुकसानीची पाहणी करावी – पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे व शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज मागणी केली आहे. “पूर परिस्थितीची गंभीर आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्याचा बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी.”असे मुंडे यांनी म्हंटले आहे.

मराठवाड्यात झालेल्या नुकसानी संदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी तत्काळ मदत द्यावी. तसेच या ठिकाणच्या नुकसानीची राज्य सरकार व प्रशासनाकडून लवकरात लवकर पाहणी करून, पंचनामे करून मदत द्यावी. येथील 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. त्याबाबत तत्काळ मदत करावी. राज्यातील अनेक गावावर पूर परिस्थितीची गंभीर आहे. यावेळी प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चोवीस तास मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उदभवलेल्या पूर्वपरिस्थितीबाबत तत्काळ बैठक घ्यावी. आणि जिल्हा प्रशासनास मदत पोहचवण्याच्या सूचना कराव्यात. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले आहे. त्या त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.