माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली ; पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या काही दिवसांपासून आपल्या मतदार संघात आहेत. सत्ता नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण ‘यश:श्री’ बंगल्यातून करण्याचा प्रयत्न मुंडे यांच्याकडून सुरु आहे. अशात पंकजा यांचे बाॅडिगार्ड गणेश यांच्या आईचे निधन झाल्याचे समजताच त्या भावूक झाल्या.

आपल्या फेसबुक पेजवरुन, “माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली…खूप वाईट झालं… किती मोठ दुःख लेकराला रे वडील ही नाहीत” अशी पोस्ट केली आहे. मुंडे सध्या मतदार संघात नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून त्या लग्नसमारंभांस उपस्थिती लावताना दिसून येत आहेत.

https://www.facebook.com/147552098663693/posts/3645059102246291/

दरम्यान, जिल्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. यामुळे मुंडे भाऊ बहिण आमने सामने आहेत. गेल्या काही दिवसांत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर शमल्याची चर्चा सुरु होती. दोघांकडूनही तसे संकेत देण्यात येत होते. मात्र तसे होताना दिसत नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment