हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंधन दरवाढीवरून काँग्रेस कडून मोदी सरकार विरोधात आज राज्यभर बैलगाडी आंदोलन सुरू असून मुंबई येथील आंदोलना दरम्यान वापरण्यात आलेली बैलगाडी नेत्यांच्या वजनामुळे तुटली आणि त्याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओ वरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार टोला लगावला आहे.
गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! मा. भाई जगताप, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंचं करावं!” असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! असे खोचक ट्विट प्रसाद लाड यांनी केले.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1413787583335735298?s=20
दरम्यान काँग्रेस कडून राज्यभर पेट्रोल डिझेल दरवाढी वरून आंदोलन सुरू असतानाच आता या घटनेनंतर काँग्रेस च्या आंदोलनाची नाचक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे.