Wednesday, February 1, 2023

नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे वक्तव्य राजकीय हेतूने – प्रवीण दरेकर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला. या कारवाई वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे ते सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य राजकीय हेतूने केले जात असल्याचे दरेकर यांनी म्हंटले आहे.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांना भाजपबद्दल माहिती दिल्यानंतर दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मलिकांवर टीका केली. दरेकरांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, तपास यंत्रणेपेक्षा ही आपल्याला काहीतरी अधिक माहिती आहे, अशा अर्विभावातून केवळ राजकीय वक्तव्य करणार्‍या नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी म्हणजे तपास करण्यास अधिक सोईस्कर होईल.

- Advertisement -

नवाब मलिक यांचे आणि एनसीबी या दोघांचे नंतर हे सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच एनसीबीच्या विषयी आपल्या मनात असलेला पोटशूळ, संताप वारंवार बाहेर काढण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत. वारंवार एनसीबीवर आरोप करून देशातील तपास यंत्रणे बद्दल अशी भूमिका घेणे चांगले नाही, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.