तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी महाविकास आघाडीची अवस्था; दरेकरांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या आघाडी सरकारमध्ये नाराजी तर नाही ना? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

भाजपानी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेल्या धुसफुसीबद्दल मत व्यक्त केले. त्यांनी आघाडी सरकारला टोलाही लगावला आहे. ते पुढे म्हणाले कि, “या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांची अवस्था हि तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झाली आहे.”

या आघाडी सरकारमध्ये आतून सगळं पोखरलेला आहे. आघाडी सरकारमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचे काम सध्या सुरु आहे.आपापसातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ माजलेला दिसत आहे. पटोले यांनी जी काही वक्तव्ये केली आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारची स्थिती हि कळते आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment