आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाची प्रवीण दरेकरांनी उडवली खिल्ली, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या ६० दिवसांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी मोर्चा पार पडला. या मोर्चाला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मात्र, या मोर्चावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

‘भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली. यासोबतच दरेकर यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितलं. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही, असंही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. पण काही राजकीय पक्ष त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी केला. (pravin darekar reaction on Farmers Protest in mumbai)

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment