फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर दरेकर संतापले; म्हणाले आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर दरेकर चांगलेच संतापले असून त्यांनी या सर्वांना दम दिला आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे असून अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज काही जण पसरवत आहेत. अशांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना दरेकर म्हणाले की, “राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आमचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे. काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, “मुंबई पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तात्काळ एफआयआर केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे”. प्रवीण दरेकर यांनी यावेळी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी चिंता व्यक्त केली. “पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. रोज हल्ले होत असल्याने पोलिसांचं मनोबल खचत आहे. पोलिसांचं खच्चीकरण झालं तर करोनाशी लढणं मुश्कील होईल. त्यांच्या सुरक्षेसाठी टोकाची कठोर कारावई करणं गरजेचं आहे,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment