हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात नोएडा इथं सर्व सोयी – सुविधांनी युक्त, अद्ययावत अशी जागतिक दर्जाची नवी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईमध्ये केली. दरम्यान, योगी मुंबईत आल्यापासून शिवसेना त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. सामनाच्या अग्रलेखातून टीका झाल्यावर भाजपचे उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी सामनाच्या संपादकीयवर टीका करताना निषेधही केला आहे. ”योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी सामना संपादकीयमधून चुकीची भाषा वापरली आहे. याचा आम्ही निषेध करतो. कदाचित ही त्यांच्या पक्षाची संस्कृती असेल. आम्ही खुल्या दिलाने बॉलिवूडच्या लोकांचे स्वागत करतो, असे सिंह म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray has lost his sleep after UP CM's visit to Mumbai. They've used offensive language using Saamna editorial, which we condemn. This may be their party culture. We were welcomed open-heartedly by Bollywood people: UP Cabinet Minister S N Singh on Saamna Editorial pic.twitter.com/j531cpuE9B
— ANI (@ANI) December 3, 2020
दरम्यान, नोएडाजवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर ही चित्रनगरी उभारण्यात येणार असून दिल्ली, मथुरा आणि आग्रा जवळ असल्यानं इथे वाहतूक सोयीची होणार आहे. सुरक्षितता, शारीरिक अंतर, सर्व सोयीसुविधा आणि स्थिर सरकार या सर्व बाबींच्या अनुकूलतेमुळे ही चित्रनगरी उपयुक्त आणि यशस्वी ठरेल. कोणाच्याही विकासात अडथळा न आणता राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’