अनिल परबांवर हक्कभंग आणणार, अधिवेशनात मुनगंटीवार यांचा इशारा; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यावेळी 12 आमदारांच्या निलंबनावर चरचा करण्यात आली तसेच विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम 28 डिसेंबर जाहीर करण्यात आला असून या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या दिवशी मतदान होणार असल्याने या मुद्यांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणी आपण परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा मुनगंटीवार यांनी अधिवेशनात दिला.

मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत चरचा करण्यात आली. यावेळी चर्चेत मंत्री अनिल परब, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, अधिवेश सुरु असताना अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे हि अधिवेशन सभागृहात आतमध्ये माहिती मिळत नाही ती बाहेरून मिळते. आणि बारा आमदार निलंबित असताना त्यांचा विचार न घेता थेट निवडणूक घेतली जाते. हि नवीन पद्धत आहे कि बारा आमदार जे मतदार आहे त्याचे निलंबन करून निवडणूक घ्यायची हा कसला प्रकार चालला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच असेल तर अगोदर बारा आमदारांचे निलंबन मागे घ्यावे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/474676710930094

सामान्य नियमही संसदीय कार्यमंत्री परब यांना माहिती नाही का? पहिल्यादा अधिवेशनाचे घोषणा करावी लागते. असे होत नाही पायाने चालायचे असते डोके खाली करून चालता येत नाही. अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणा, अशी मागणी यावेळी मुनगंटीवार यांनी केली. यावर अनिल परब उत्तर देताना म्हणाले की, अशी कोणती घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा कार्यक्रम अधिकृत जाहीर होईल तेव्हा घोषणा केल्या जातील, असे स्पष्टीकरण परब यांनी दिले.

Leave a Comment