महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडेकृत्य, पाप झालेय उत्तर मागणार – सुधीर मुनगंटीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवेचा उडालेला बोजबावारा या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आज महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडे कृत्य, पाप होत आहे. यामुळे तरुण तरुणींच्या मध्ये राज्याबद्दल या सरकारबद्दल आक्रोश, रोष आहे. हे सरकार खरे लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशनाचा लकालावधी वाढवतील अन्यथा ते भक्षक असतील तर कमी करतील, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात आज अनेक प्रकारच्या समस्या, प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे, पेपरफुटीचा घोटाळा आहे. या शंकांचे निरसन लोकशाहीच्या मार्गाने करायचे असेल तर एकच ठिकाण आहे ते म्हणजे विधानभवन हे एक ठिकाण आहे. आज लोकशाहीच्या दृष्टीने काही महत्वाचं प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. हे जर खरे लोकशाहीचे रक्षक असतील तर ते या प्रश्नांवर उत्तरे देतील. आणि अधिवेशनाचा कालावधी वाढवतील.

या सरकारने कमीत कमी एक आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे. कारण राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मंत्रालय तर भ्रष्टाचाराचा अड्डाच बनलेला आहे. त्यामुळे राज्याचे अर्थचक्र हे कोमात घेलेले आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणा भ्रष्टाचार झालेला आहे. या सर्व प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कमीत कमी कालावधी हा एक आठवडा करायला पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

ठाकरे सरकारकडून लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली

यावेळी अधिवेशनाच्या कालावधीच्या निर्णयावर मुनगंटीवार म्हणाले की, संसदीय कामकाज मंत्री बाहेर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत बोलतात. बीएसीच्या बैठकीत याबाबत एक शब्दही सांगितला गेला नाही. राज्य सरकार सुडाचं राजकारण करत असेल. 12 आमदारांना मताचा अधिकार न देता, बीएसीच्या बैठकीत अध्यक्षाची निवडणूक ही लोकशाहीच्या मूल्याची पायमल्ली करणार असाल तर ही योग्य नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Leave a Comment