भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन केले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, राज्याची तिजोरी मोकळी आहे. अशावेळी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज देत आहे. मोदी सरकारने गेल्या लाॅकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रुपाने तुटपुंजी मदत केली होती.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.  सरकारच्या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

You might also like