ममता बॅनर्जींविरोधात भाजप कडून पोलीस तक्रार; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस तक्रार दाखल केली आली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ममता बॅनर्जी यांनी ‘सिव्हील सोसायटी’च्या भेटीत संवाद साधत असताना त्यांच्या राष्ट्रगीताच्या काही ओळी खुर्चीवर बसून म्हटल्या. त्याशिवाय त्यांनी पूर्णपणे राष्ट्रगीताच्या ओळी म्हटल्या नाहीत असा आरोप भाजपने केला आहे. ममता बॅनर्जी यांची ही कृती राष्ट्रगीताचा अपमान करणारी असल्याचे भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा अतिशय जोरदार चर्चेत आला. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत दिले.

You might also like