Thursday, February 2, 2023

भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले आहे. भाजपचेच साडेतीन लोक तुरुंगात जातील असा दावा करत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, गेले काही दिवसांपासून भाजपकडून तो जेलमध्ये जाईल, हा जेल मध्ये जाईल अस सांगितले जात आहे. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचेच साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, आता खुप झालं. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता बघाच, तुम्हांला आता कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.