भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

यावेळी ते म्हणाले, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी २०१४ व्हीजन टी-२० चा जाहिरनामा तयार केला होता. तोच जाहिरनामा यावर्षी छापलेला आहे. २०१४ च्या जाहिरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदूमिलच्या जागेत करण्याची ग्वाही दिली होती. मात्र या पाच वर्षात त्यांच्याकडून काही काम झाले नाही. एक वीट देखील उभा केली नाही. आता पुन्हा हे आश्वासन २०१९ च्या जाहिरनाम्यात दिले आहे. असा आरोप सावंत यांनी भाजप सरकारवर केला.

शेतकऱ्यांच्या आत्महता होणार नाहीत, त्यांना भरीव मदत करण्याचे जाहिरनाम्यात होते. मात्र पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे राज्याचे दुर्दैव असून फडणवीस सरकारची मान खाली जात आहे. २०१४ च्या जाहिरनाम्यातील आश्वासने पूर्ण झाली नाहीत. तीच आश्वासने २०१९ ला दिली जात आहेत. भाजपने अप्रत्यक्षपणे पाच वर्षात काही कामे करता आली नाहीत. अशी स्पष्ट कुबली या जुमलानाम्यातून दिली असल्याचा टोलाही सावंत यांनी सरकारला लगावला.

मुख्यमंत्री म्हणत होते राज्यात भाजप-सेनेच्या २२० जागा निवडून येणार, इतक्या जागा येणार होत्या तर मग उत्तरप्रदेश, दिल्लीतील नेत्यांची फौज महाराष्ट्रात कशासाठी बोलवली जात आहे. हे नेते धापा लागूपर्यंत राज्यात प्रचार करत आहेत. भाजपची सत्तेची धुंदी आता उतरली आहे. त्यांना परिवर्तन दिसत आहे. आमच्याकडे पैशाची ताकद नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे पैशाची गरज नाही. असा विश्वासही सावंत यांनी बोलतांना व्यक्त केला.

Leave a Comment