Tuesday, January 7, 2025

BJP Menifesto | भारतीय जनता पक्षाने सादर केला जाहीरनामा; शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद

BJP Menifesto | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा देखील सादर केला आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टीने देखील त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा विचार करून भाजपने हा जाहीरनामा (BJP Menifesto) सादर केलेला आहे. यामध्ये गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची हमी देखील त्यांनी दिलेली आहे. आता या जाहीरनामात नक्की कोणत्या घोषणा केलेल्या आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार | BJP Menifesto

जुलै महिन्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत त्यांनी राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती. परंतु आता याच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन भाजपकडून करण्यात आलेले आहेत. म्हणजेच वर्षाला जवळपास 25 हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासोबतच भाजपने पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दर वर्षाला 15000 रुपये देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. तसेच वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहे. आणि म्हणजेच ही रक्कम दरवर्षी 25 हजार रुपये होणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील स्थिर ठेवण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितलेले आहे.

भाजपने दिलेल्या या जाहीरनाम्यामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांना दर महिन्याला 10 हजार रुपये शिक्षणासाठी देण्याचे सांगितलेले आहे. तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी 45 हजार गावांमध्ये पांदन रस्ते बांधणार असल्याचे देखील त्यांनी निवडून जाहीरनाम्यात सांगितलेले आहे .

आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी योजना

ग्रामीण भागांमध्ये ज्या आशा आणि अंगणवाडी सेविका काम करतात. त्यांना दर महिन्याला 15 हजार रुपये मानधन देणार असल्याचे देखील भाजपने जाहीरनाम्यात सांगितलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाचे बिल शून्य रुपये या आधीच केले होते .परंतु आता भविष्यात जाऊन 30 टक्के कपात होणार असून सौर उर्जेवर जास्त भर देण्याचे भाजपने सांगितलेले आहे. निवडणूक संपल्यानंतर 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

सोयाबीनला 6000 रुपये हमीभाव

शेतीसाठी जी आवश्यक खते लागतात, त्यावरील राज्य आणि वस्तू सेवा कर यामध्ये पूर्णपणे सवलत देण्याचे भाजपने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे सोयाबीनला प्रत्येक क्विंटल 6 हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन देखील भाजपकडून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन वर्षात 50 लाख महिलांना ते लखपती दिदी बनवणार आहेत. यासाठी 500 बचत गटांकरता 1000 कोटींचा फिरता निधी तयार करून देणार आहे. त्याचप्रमाणे अक्षय अन्न योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचे देखील आश्वासन दिलेले आहे. सर्व शासकीय शाळांना त्या रोबोटिक आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देखील देणार आहे.

दहा लाख उद्योजक घडवणार | BJP Menifesto

महाराष्ट्रातील कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आश्वासन देखील भाजपने दिलेले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करणार आहेत. आणि दहा लाख उद्योजक घडवणार आहे.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

भाजपने युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन करून, त्याचे जतन करण्याच्या आश्वासन दिलेले आहे. जेष्ठ नागरिकांसाठी त्यांनी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्य रुग्णांनी सेवा देण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे.

धर्मांतराला आळा

भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शक्तीचे धर्मांतर करण्या विरोधात कायदा करणार असल्याचे सांगितलेले आहे. तसेच फसव्या धर्मांतराला आळा घालण्यात येणार आहे. यासाठी अनेक कायदे बनवले जाणार आहेत. हे देखील त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानव आणि वनजीव संघर्ष टाळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.