हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोनाचा कहर काही कमी होताना दिसत नाही.सामान्य माणसांप्रमाणेच अनेक चित्रपट कलाकार आणि राजकिय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शाह याना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.आता केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही करोनाची बाधा झाल्याचं वृत्त समोर येत आहे.मेघवाल यांच्याकडे अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज या दोन विभागांचं राज्यमंत्री पद आहे
शनिवारी मेघवाल यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आपला करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या वृत्ताला मेघवाल यांनी दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन मेघवाल पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी भाभीजी पापड या ब्रँडचं उद्घाटन करत असताना मेघवाल यांनी म्हणले होते की भाभीजी पापड खाल्ल्यामुळे करोना विषाणूशी लढण्यास मदत होते. या पापडांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल असं मेघवाल म्हणाले होते. या विधानानंतर मेघवाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
अर्जुन मेघवाल यांच्याव्यतिरीक्त आणखी एक केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.




