लवकरच “स्वदेशी पेट्रोल” आणणार ! भाजप नेत्याचा अजब दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या १० ते १२ दिवसांपासून सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतीमुळे सत्ताधारी भाजप हा विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य बनत राहिला आहे. अशातच भाजप नेते खासदार अश्विनी कुमार चौबे यांनी अजब दावा करत गजहब विधान केले आहे.

आज दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना चौबे म्हणाले की “पेट्रोलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारभावात कच्या तेलाच्या अर्थात क्रूड ऑइल च्या किंमती वाढल्याने वाढत आहेत. त्यामूळे पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. तरीही मोदी सरकार महागाई नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करतं आहे. त्यादृष्टीने लवकरच आम्ही पावले देखील उचलणार आहोत.लवकरच आम्ही “स्वदेशी पेट्रोल – डिझेल आणण्याच्या दिशेने प्रयत्न करणार” असल्याचं अजब विधान देखील केलं. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली.

दरम्यान, सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’