आता हिंदूविरोधी ठाकरे सरकारची हंडी फोडण्याची वेळ; भातखळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये तयासाठी दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करीत निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये, अशी टीका भातखळकरांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या निर्णयावर आमदार भातखळकरांनी ट्विटद्वारे टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दहीहंडीच्या उत्सवाबाबतच्या निर्णयावर भाजप आमदारांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. भाजप आमदारांकडून आता या उत्सवाचे भांडवल करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलावा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशाराच दिलेला आहे.

Leave a Comment