“हे तर निबर कातडीचे संवेदना हरवलेले सरकार…”, भाजपा नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्वप्नील लोणकर या तरुणाला एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे लोणकर याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येवरून पावसाळी अधिवेशनात भाजपने सरकारला धारेवर धरले. भाजपने सरकारवर गंभीर आरोप करत टीकाही केली. त्यानंतर  स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार…,” असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून या ना त्या अनेक कारणांनी टीका केली जात आहे. कधी शिवसेना तर कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार…”

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यापूर्वीही अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उयांच्यावर टीका केली आहे. त्यांनी अजून एक ट्विट केले असून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “कोरोनामागे सर्व यंत्रणा लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य समस्या तर वाढवल्याच, शिवाय सामाजिक व्यवस्थेलाही धक्का लावला. लॉकडाऊननंतरचे आर्थिक संकट व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे राज्यात बालविवाह वाढलेत. मुख्यमंत्री बसलेत करोनाची सनई फुंकत आणि चौघडे पिटत असल्याचे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment