उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत मोठे; ते काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करतात – अतुल भातखळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी “उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात,” असे ट्विट करीत मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.

भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले कि, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थितांना ‘सद्भावना’ दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली. उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेना प्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात, असे ट्विटमध्ये भटखळकरांनी म्हंटले आहे.

शिवसेना व काँग्रेसवर सध्या भाजपकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. त्यांच्यावर भाजपनेत्यांकडून हल्लबोलही केला जात असल्याने त्याला महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. दरम्यान आज भाजपनेते तथा आमदार भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Leave a Comment