महाविकास आघाडी सरकार हे मुघलांच्या वृत्तीचे; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचे सांगलीत आयोजन करण्यात आले. राज्य सरकारला इशारा देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज पडळकरांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार काय बोलतात त्याला काडीचीही किंमत नाही” असे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडी सरकार हे मुघलांच्या वृत्तीचे आहे,” अशी टीका केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कराड येथील बैलगाडा शर्यतीबाबत संघटनांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यत संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. दरम्यान, आमदार पडळकरांनी कराड येथील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी भेटही दिली. त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी पडळकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार बैलगाडा शर्यतीबाबत जे काही बोलत आहेत. त्यांनी जी काही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळी स्टेटमेंट केली आहेत. त्याला काडीचीही किंमत नाही. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणे पहावी. बैलगाडी शर्यंत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, असे ते म्हणतायत.

वास्तविक, पाहता या सरकारला झ- यातले बैलगाडा शर्यतीतले आंदोलन सरकारला मोडून काढायचे होते. मात्र, त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. या सरकारने बैलगाडा शर्यत भरवणाऱ्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे गड, किल्यांवर फिरायचे. त्याप्रमाणे शेतकर्याना व्हिव्हिस किलो मित्र बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी फिरावे लागत आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे महाविकास आघाडी सरकार मुघलांच्या वृत्तीचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना पडळकर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत कोर्टात राज्य सरकारनेच वकील नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही, असे ते सांगत आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत पंधरा महिने झाले निर्णय नसल्याचेही पडलकरांनी सांगितले.

Leave a Comment