कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर ठाकरे सरकार जबाबदार; गोपीचंद पडळकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरुच आहे. मात्र, याबाबात अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात मंत्री अनिल परब यांच्या निजामशाहीमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहिल, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत ठाकरे सरकावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पोलिसांचा वापर करून मंत्रालयाकडे निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय. लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात मंत्री अनिल परब यांना उद्रेक घडवायचाय का? यांच्या निजामशाहीमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहिल.

आजवर 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे सरकार झोपेचे सोंग घेत आहे. जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून मंत्री अनिल परब हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? 31 कर्मचाऱ्यांच्या आत्म्यांचा तळतळाट तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी परिवहनमंत्र्यांनी मान्य करावी तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Leave a Comment