हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत दिली. यावरून आता भाजप नेत्यांकडून आव्हाड यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता आमदार राम सातपुते यांनी टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला आहे, अशी टीका सातपुते यांनी केली.
भाजप आमदार राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जी म्हाडाची परीक्षा होणार होती. ती देण्यासाठी लाखो विद्यार्थी शेकडो किलोमीटर लांब असणाऱ्या परीक्षा ठिकाणी एसटी, रेल्वेने जमेल त्या वाहनाने परीक्षा देण्यासाठी आले. हजारो विद्यार्थी एसटी स्टॅन्ड वर, रेल्वे स्टेशनवर झोपून आजच्या परीक्षेची वाट पाहत होते परंतु निष्क्रिय असणाऱ्या सरकारने सकाळच्या वेळेस पहाटे महाडचे परीक्षा रद्द केली.
सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच वाटोळं करायचा संकल्प केला दिसतोय.आज होणारी म्हाडा ची परीक्षा पुढे ढकलली.विद्यार्थ्यांचा किती तळतळाट घेणार हे सरकार.विद्यार्थी रेल्वे स्टेशन ला जाऊन झोपले आहेत,कोणी बस,रेल्वे प्रवासात आहेत आणि परीक्षा रद्द..😡@Dev_Fadnavis pic.twitter.com/ZeSwFupTmZ
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021
सातपुते त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गाढवाच नांगर फिरवण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारने महाराष्ट्रातल्या तरुणाला देशोधडीला लावायचे आहे.
या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी म्हाडाची परीक्षा आणि पहाटे परीक्षा रद्द करतात.निष्क्रिय,कर्मदरिद्री,वाचाळ आणि गचाळ सरकारचा निषेध.थोडी लाज शिल्लक असेल तर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा @Dev_Fadnavis @TV9Marathi @abpmajhatv @LoksattaLive
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021
या सरकारला विद्यार्थ्यांचं वाटोळं करायचं आहे हा संकल्प राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय पवार साहेबांना वाढदिवशी घेतला आहे की काय ? असा सवाल राम सातपुते यांनी आव्हाड यांना यावेळी विचारला आहे.