हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर घात केला आहे. त्यामुळे आता भविष्यात जनताच त्यांना उत्तर देणार आहे, असे लाड यांनी म्हंटले.
आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राज ठाकरे याची भेट घेतली आहे. आम्हाला खात्री आहे की, जिल्हा बँक निवडणुकीत ते आमच्यासोबत येतील. बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा आहे. मी प्रविण दरेकर यांच्याशी त्यांचा संवाद करुन दिला. प्रविण दरेकर त्यांची भेट घेण्यासाठी येतील.
भाजप आणि मनसे यांच्यातील युतीचा प्रश्न हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस घेतील. मी जिल्हा बँकेच्या संदर्भात भेटलो आहे. सर्व पक्षांनी राजकीय भूमिका बाजुला ठेऊन बँकेसाठी प्रयत्न करत आहोत. सर्वजण मिळून मुंबईच्या सहकाराला नवी दिशा देऊ, असे लाड यांनी यावेळी सांगितले.