भाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्व चे आमदार अतुल सावे यांनी ५० खतांचे सुसज्ज अशे ईआयसोलेशन कोविद सेंटर ची उभारणी केली आहे. या सेंटर ला पंडित दीनदयाळ उपाध्याय देण्यात आले असून उद्या सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेंटर चे लोकार्पण होणार असल्याचे आज भज कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या महिनाभर पासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे . अनेक सूक्ष लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीये . याच पार्शवभूमीवर आमदार अतुल सावे यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने गारखेडा परिसरात ५० बेड्चे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये २० बेड ऑक्सिजन युक्त असून महिला व पुरुष यांना स्वतंत्र व्यवस्था करण्यात अली आहे. त्या सोबतच जर एखाद्या रुगणाला तातडीने दुसऱ्या रुगणालयात हलवण्याची गरज भासली तर त्यासाठी रूगनवाहिका सेवा देखील या केंद्रावर आहे. सोबतच जेवणाची औषधउपचाराची व्यवस्था सुद्धा या केंद्रावर आहे.

उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पणा दरम्यान मोजक्या लोकांनाच परवानगी असेल. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास हे लोकार्पण होणार आहे.

Leave a Comment